logo

“बंगल्यासमोर बिल्डिंग बांधली, समुद्र कसा बघू?”, म्हणत दक्षिण मुंबईत १९ फ्लॅट्स विकत घेणारी ‘ती’ आहे तरी कोण,..........?

मुंबई -
बंगल्याच्या मागे असलेल्या इमारतीमुळे समुद्र मनसोक्त पाहता येणार नाही .
या चिंतेने महिलेने मुंबईत मलबार हिल येथे तब्बल १९ फ्लॅट्स घेतले आहेत. नेमका हा व्यवहार कसा झाला व कुणी केला?
"रेखा झुनझुनवाला" यांची मुंबईत कोट्यवधींची खरेदी
दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी मलबार हिल येथील एका इमारतीतील सर्व फ्लॅट्स तब्बल ११८ कोटींना विकत घेतल्याचे वृत्त आहे. मनीकंट्रोलच्या हवाल्याने फायनान्शियल एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अथांग अरबी समुद्राचा नजारा विना अडथळा अनुभवता यावा यासाठी रेखा यांनी सदर व्यवहार केल्याचे समजतेय. यापूर्वी झुनझुनवाला यांच्या मलबार हिल येथे स्थित ‘RARE’ व्हिलातुन समुद्राचे सुंदर दृश्य पाहता येत होते, मात्र या व्हिलाच्या मागेच असलेल्या रॉकसाइड सोसायटीचे क्लस्टर स्कीम अंतर्गत पुनर्बांधकाम होणार होते. यानंतर व्हिलामधून दिसणाऱ्या सी व्ह्यूमध्ये अडथळा येणार होता, हे टाळण्यासाठी रेखा यांनी रॉकसाइड सोसायटीमधील सर्व फ्लॅट्स ११८ कोटी रुपये खर्च केले आहेत....

145
3401 views